Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मधील राजमाता जिजाऊ उद्यानात रविवार पहाटे पासून रंगणार सोनेरी – चंदेरी , ‘ दिवाळी पहाट ‘ … रसिकांना मिळणार यंदा या विविध कार्यक्रमांची मेजवानी !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २२ ऑक्टोबर) : अंगणात आकर्षक रांगोळी, आकाश कंदील, दिव्यांची रोषणाई व सोबत फराळाचा आस्वाद घेता येणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सव काळात आमदार ‘लक्ष्मण पांडुरंग जगताप’ यांच्या संकल्पनेतून आणि शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे पिंपळे गुरव मधील राजमाता जिजाऊ उद्यानात रविवार २३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर पर्यंत दररोज पहाटे ०५.३० ते सकाळी ०८.०० वा. पर्यंत पिंपरी चिंचवडवासीयांना ‘दिवाळी पहाट’ च्या माध्यमातून विविध खमंग कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

Google Ad

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप मित्र परिवार , भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

✨अशी असेल चंदेरी-सोनेरी दिवाळी पहाट मेजवानी✨

▶️रविवार दि.२३-१०-२०२२
रोजी पहाटे ०५.३० वा. ते ८.०० वा.

प्रसिद्ध पार्श्वगायक त्यागराज खाडिलकर, संज्योत जगदाळे, स्वप्ना काळे, राजू जाधव यांचा गायनाचा कार्यक्रम

▶️सोमवार दि.२४-१०-२०२२
राजी पहाटे ०५.३० वा.

प्रसिद्ध पार्श्वगायक राधा खुडे, रविंद्र खोमणे, सायली टाक, मनीष ठुम्बरे यांचा गायनाचा कार्यक्रम

▶️मंगळवार दि.२५ -१०-२०२२
पहाटे ०५.३० वा. ते ८.०० वा.

महाराष्ट्राची प्रसिद्ध पार्श्वगायिका योगिता गोडबोले, आंतरराष्ट्रीय कलाकार ममता नेने, गणेश कुमार, अश्विनी, गणेश कुमार यांची गाणी

▶️बुधवार दि.२६-१०-२०२२
रोजी पहाटे ०५.३० ते ०८.०० वाजेपर्यंत

प्रसिद्ध गायक नितीन कदम, आकाश कुंभार, नामदेव तळपे यांचा गायनाचा कार्यक्रम

▶️दिपोत्सव सर्व धार्मिक स्थळे बुधवार दि . २६ / ११ / २०२२ रोजी सायंकाळी ६ ते ८

बाजारपेठेत लगबग वाढली

पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. रांगोळी, रांगोळी स्टिकर, पणत्या, आकाश कंदील खरेदीसाठी नागरिकांची दुकानदारांसोबत किंमत कमी करण्यासाठी घासाघीस होत आहे. कंदील खरेदीमुळे इलेक्ट्रिक वस्तूंची मागणीही वाढली आहे. विविधरंगी बल्ब, तोरण, वायर, होल्डर खरेदी केली जात आहेत. त्याचबरोबर रेडीमेड फराळही विक्रीसाठी उपलब्ध असून, नोकरदार महिलांनी आगाऊ ऑर्डर देऊन या फराळाची बुकिंग केली आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या फराळालाही मागणी वाढली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!