महाराष्ट्र 14 न्यूज, (दि..५ऑक्टोबर.) : ध्रूव अकादमी नवरात्री नाईट 2022 डायरेक्टर श्रद्धा पाटील आणि VJ’S TEAM यासमवेत मास्टर माईंड ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज भोसरी इथे गरबा नृत्य नवरात्रि या उत्सवाचे औचित्य साधून खुप जल्लोषा मध्ये हा नृत्या चा कार्यक्रम ध्रुव अकादमी ने साजरा केला.
या वेळी कमलेशताई बाहरवाल या कार्यक्रमा साठी प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या, त्या प्रदेश उपाध्यक्षा : भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र तसेच संस्थापक/अध्यक्ष : अध्ययन सोशल फांऊडेशन आणि संस्थापक/अध्यक्ष : हिंदवी स्वराज महिला संघटना असे त्यांचे कार्य आहे . त्यांच्या या कामकाजातून त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे तसेच मास्टर माईंड ग्लोबल स्कूल भोसरी च्या आदरणीय मुख्याध्यापिका डॉ . प्रदीपा नायर मॅडम यांचे देखील मना पासून आभार त्यांचे मार्गदर्शन हे वेळोवळी आम्हांला प्रेरणा देते.