Google Ad
Editor Choice

नवी सांगवी च्या पी. डब्लू. डी मैदानात ५१ फुटी रावणा बरोबर सेल्फी काढण्या करिता गर्दी … दहनाकरीता काहीच तास शिल्लक …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ ऑक्टोबर) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आयोजित व शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विजयादशमी निमित्त नवी सांगवी येथील पी. डब्लू. डी मैदान येथे सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या उपस्थितीत महाभोंडला, दांडिया व रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मैदानात फटाक्यांनी भरलेल्या ५१ फुटी रावणा बरोबर आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. आज दसऱ्याच्या दिवशीअग्निबाणांनी या पुतळ्यांवर बाण चालवत पुतळ्याला आग लागताच धुराचे लोट जळू लागतील आणि त्यातील फटाके फुटू लागतात आणि त्यामुळे रावणाचा दहन होतो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो, याची तयारी जोरात सुरू असून मोठे स्टेज तयार करण्यात आले असून त्यासमोर भोंडला आणि दांडिया खेळण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. नागरीक तयारी पाहण्यासाठी आत्ताच मैदानावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे सांगवी पिंपळे गुरव परिसरात रावण दहणाची चर्चा रंगू लागली आहे.

Google Ad

नवी सांगवी साई चौक येथील पी डब्ल्यू डी ग्राउंडवर रावणाची ५१ फुटी भव्य प्रतिकृती उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे दहन व नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येणार आहे . असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमी हा दिवस साजरा केला जातो . प्रभू श्रीरामांनी याच दिवशी रावणाचा वध केला तसेच महिषासुरमर्दिनी देवी दुर्गा यांनी महिषासुर नावाच्या राक्षसाचा या दिवशी वध केला असल्याने या विजयाची साक्ष म्हणून विजयादशमी हा दिवस साजरा केला जातो .जास्तीत जास्त नागरिक बंधू भगिनी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर, माजी नगरसेवक-नगरसेविका पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!