महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद लोकमान्य मेडिकल फौंडेशन पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आरोग्य विभाग पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथील राजमाता जिजाऊ सभागृहात आशा स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षां गुंजाळ व सहायक गटविकास अधिकारी गरीबे यांच्या हस्ते करण्यात आले लोकमान्य हॉस्पिटल चे आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुख डॉ जयंत श्रीखंडे यांनी आपघात झाल्यावर कशा पद्धतीने मदत केली पाहिजे याची माहिती दिली.
तर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे चे विवेक नायडू यांनी सर्पदंश आग पूर परिस्थिती भूसंखलन आदी विषयांवर सविस्तर माहिती व प्रात्यक्षिक द्वारे कशा पद्धतीने काम केले पाहिजे हे दाखविले या प्रशिक्षणाला लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर & रिसर्च सेंटर चिंचवड पुणे चे सी. ई. ओ. डॉ विशाल क्षीरसागर संचालक श्रीनिवास पत्तार उपसंचालक डॉ बीना राजन बाळासाहेब सावंत उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित जनसंपर्क अधिकारी सहदेव गोळे यांनी केले