Google Ad
Editor Choice

विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त भोसरीत उद्योगाबाबत मार्गदर्शन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : ” प्रयत्न अथवा काम न करता कारणे सांगणारी माणसे यशस्वी होत नाहीत , ” असे मत मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक राजश्री गागरे यांनी व्यक्त केले . विश्वकर्मा पूजन अर्थात उद्योग दिनानिमित्त लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे भोसरीतील आदर्श शाळेच्या सभागृहात उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी आयोजित मेळाव्यात ‘ उद्योग व्यवस्थापन या विषयावर गागरे बोलत होत्या .

Google Ad

माजी नगरसेविका प्रियांका बारसे उपस्थित होत्या . गागरे म्हणाल्या , “ उद्योग , व्यवसाय भरभराटीला नेण्यासाठी लहान – मोठ्या चुका टाळाव्यात . ” सहकारातून समाजाचा विकास कसा करता येईल आणि त्या सहकारी संस्था व बचत गट कसे स्थापन करावे , तसेच त्यासाठी पात्रता , अटी काय आहेत याविषयी विस्तार अधिकारी दिनेश सोनाळेकर यांनी मार्गदर्शन केले . उद्योजक औदुंबर कळसाईत यांनी ‘ मी कसा घडलो ‘ याविषयीचा प्रवास सांगितला .

स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक ज्ञानदेव माने यांनी , ‘ बँकेत कर्ज घेताना बँक तुमची व्यवसायाशी असलेली बांधिलकी तपासते . त्यानंतरच तुम्हाला कर्ज देण्याचा विचार करते , ‘ असे सांगितले . संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक केले . शिवाजीराव कळसे यांनी आभार मानले . प्रमोद लाड यांनी संयोजन केले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!