Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील ५ वर्षाखालील १ लाख ८८ हजार बालकांना प्रतिबंधक लस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ फेब्रुवारी) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत शहरातील ५ वर्षाखालील बालकांना प्रतिबंधक लस पाजण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते महापालिकेच्या सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी प्रसूतीगृह येथे बालकांना पोलिओ डोस पाजून करण्यात आला.

या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख ८८ हजार बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात आला.पोलिओ लसीकरणासाठी शहरात एक हजार २९ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. याकरिता ६० वैद्यकीय अधिकारी व २२० पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Google Ad

या  प्रसंगी शिक्षण समिती सभापती माधवी राजापूरे, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. एस. डी. कुरुंदकर, जागतिक आरोग्य संघटनेचे राज्य प्रतिनिधी डॉक्टर राजीव कुमार जिल्हा प्रतिनिधी डॉ. चेतन खाडे, महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.विजया आंबेडकर, डॉ. तृप्ती सागळे, रोटरियन बालाजी अय्यर, पब्लिक हेल्थ नर्स शोभा ढोले, बाबुराव घोलप महाविद्यालयाचे स्वयंसेवक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच लसीकरण केंद्रावर अगदी व्यवस्थित पणे लसीकरण करण्यात येत असल्याचे दिसून आले, यामध्ये पिंपळे निलख दवाखाना, पिंपळे सौदागर दवाखाना, दापोडी दवाखाना, वाल्हेकर वाडी दवाखाना या ठिकाणी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण सुरू असल्याचे दिसून आले. आजपासून आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या मार्फत घरोघरी जाऊन उर्वरित लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे पिंपळे निलख च्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री शेलार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!