महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ जून २०२१) : प्रतिनियुक्तीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपआयुक्तपदावर कार्यरत असलेले मंगेश चितळे यांना उपआयुक्त,नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेली असल्याने त्यांना आज महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, , शासन शासन आदेश क्र. आदेश क्र. एमसीओ२०२१/प्र.क्र.१०५(१०)/नवि-१४, दिनांक १८ जून, २०२१ अन्वये श्री.मंगेश चितळे, उप आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना मुख्याधिकारी गट-अ संवर्गातून मुख्याधिकारी गटअ (निवडश्रेणी) संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात येवून उपायुक्त,नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आलेली असल्याने मंगेश चितळे यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेमधून कार्यमुक्त केले आहे.
श्री.मंगेश चितळे हे उप आयुक्त, आकाशचिन्ह परवाना विभागाचे उपआयुक्त म्हणुन महापालिकेत कार्यरत होते. त्यांना नवीन नियुक्तीच्या पदावर रुजू होण्यासाठी आज मध्यान्होत्तर महानगरपालिका सेवेमधून कार्यमुक्त करण्यात आले.
1 Comment