Google Ad
Editor Choice india

खूशखबर ! मोदी सरकार या महिन्यात देत आहे मोफत घरगुती LPG गॅस कनेक्शन , वाचा कुणाला मिळेल लाभ ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९जून) : तुम्हाला देखील मोफत घरगुती गॅस कनेक्शन (LPG connections) घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) मोफत घरगुती गॅस कनेक्शन देऊ करते. बिझनेस स्टँडर्डच्या बातमीनुसार या महिन्यात जूनमध्ये PMUY चा पुढील टप्पा सुरू होत आहे. अशी माहिती मिळते आहे की सध्याच्या योजनेचा हा टप्पा आधीच्या टप्प्याप्रमाणेच असेल. नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY) पुढील टप्प्याच्या आराखड्याला अंतिम स्वरुप दिले आहे आणि लवकरच हा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

▶️अर्थमंत्र्यांनी केली होती घोषणा
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोफत घरगुती एलीपीजी गॅस योजनेचा (Ujjwala) विस्तार करण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की आणखी एक कोटी लाभार्थ्यांना या योजनेच्या अखत्यारित आणले जाईल. तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहा तर जाणून घ्या सर्वकाही.

Google Ad

▶️कुणाला मिळेल लाभ?
Pradhan Mantri Ujjwala Yojana या योजनेअंतर्गत सरकार दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन ऑफर करतं. हे कनेक्शन कुटुंबातील महिलांच्या नावे देण्यात येतं. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे अधिक मदत मिळाली आहे.

अशाप्रकारे कराल ऑनलाइन अर्ज
-तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर सर्वात आधी Pradhan Mantri Ujjwala योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर pmujjwalayojana.com जा
-याठिकाणी होमपेजवरून फॉर्म डाऊनलोड करा
-डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर या योजनेचा फॉर्म ओपन होईल
-हा फॉर्म भरताना तुम्हाला नाव, ईमेल आयडी, फोन क्रमांक, कॅप्चा कोड भरावा लागेल. यानंतर ओटीपी जेनरेट करण्यासाठी देण्यात आलेल्या बटणावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करा
-हा फॉर्म तुम्ही जवळच्या एलपीजी एजन्सीमध्ये जाऊन भरू शकता
-यासह तुम्हाला काही कागदपत्र देखील द्यावी लागतील. जसं की आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचं प्रमाणपत्र, तुमचा फोटो इ.
-कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!