महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०२ जून २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.०२ जून २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ३७२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २७६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर ३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला यातील १९ रुग्ण हे पिंपरी चिंचवड शहरातील तर ११ रुग्ण हे पिं. चिं. मनपा हद्दीबाहेरील आहेत.
पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.
1 Comment