Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरीतील बाजारपेठेत निर्बंध शिथिल होताच नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे चित्र

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२जून) : राज्यात सर्वत्र एकसारखे आदेश लागू न करता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लॉकडाऊन निर्बंध शिथिल करताच खरेदीसाठी नागरिकांनी पिंपरी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केल्याने रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी पहायला मिळाली. पालिकेने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवडमध्ये सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू होती.

भाजी मंडई, इलेक्ट्रॉनिक वस्तू, हार्डवेअर, कटलरी, मोबाईल, कपड्याची दुकाने, किरणा दुकाने दुकाने याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र सगळीकडे पहायला मिळाले. रस्त्यावरही वाहनांची एकच गर्दी, आणि त्यातून खरेदीसाठी आलेले लोक रस्ता शोधत असल्याचे पहायला मिळाले. यावेळी अनेकांनी मास्क लावले होते पण ते नाकाच्या खाली, यामुळे निर्बंध शिथिल होताच नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे चित्र शहरातील गर्दीच्या ठिकाणी असल्याने पुन्हा परिस्थिती काय होईल याचे भान कोणालाही नसल्याचे दिसून आले.

Google Ad

दरम्यान, पालिका हद्दीत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार असली तरी दुपारी तीन नंतर वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही कारण नसताना बाहेर पडण्यास मनाई राहणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. हे बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी लक्षता ठेवायला हवे, नाहीतर काय होऊ शकते हे सर्वजण गेले अनेक दिवस पाहत आहात. त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या …

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!