महाराष्ट्र 14 न्यूज : शनिवार दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय कोवीड लसीकरण अभियान चा शुभारंभ मा पंतप्रधान भारत सरकार मा नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते झाले नंतर पुणे जिल्हा कोवीड लसीकरण अभियान मोहिमेचा शुभारंभ मा राजेश फ देशमुख जिल्हाधिकारी पुणे यांचे हस्ते झाला.
मोहिमेचा प्रारंभ श्रीमती कर्डिले अधिसेविका व डॉ किरण खलाटे भिषक (कोविड योद्धा राज्यपाल पुरस्कार ने सन्मानित) यांना लस देऊन झाले,सदर प्रसंगी मा डॉ संजय देशमुख उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ, डॉ अशोक नांदापुरकर जिल्हा शल्यचिकित्सक पुणे, डॉ भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे, डॉ नितीन बिलोलीकर शल्यचिकित्सक, डॉ वैशाली डोईफोडे अति जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ प्रकाश रोकडे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, श्रीमती मंगल जाधवर मेट्रन व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते़.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ,सफाई कामगार ई एकूण 60 लाभार्थ्यांना भारत बायोटेक कंपनीचे Covaxin लसीचे लसीकरण करणेत आले़ लसीकरण पश्चात कोणत्याही प्रकारचे विपरीत परिणाम दिसून आले नाहीत. सदर मोहीम मा डॉ अशोक नांदापुरकर जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शन खाली डॉ संतोष देशपांडे वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) व श्रीम.जेनीफर घोडके,श्रीम. सुष्मा आयघोळे यांनी लसीकरण, संगणकिय नोंदणी पडताळणी निखील जाधव, उदय माळेकर,अश्विनी बेल्हेकर सारीका पाटोळे यांनी कामकाज पाहिले व मोहीम रुग्णालयीन सर्व अधिकारी कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.
125 Comments