Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आढळले ९६६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण … तर ६३० रुग्ण कोरोना मुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. १ सप्टेंबर २०२० ) रोजी ९८५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ९६६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील १९ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत एकूण ३७३८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आज ६३० रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

Google Ad

आज मृत झालेले रुग्ण भोसरी (पुरुष ८१ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६३ वर्षे, पुरुष ७६ वर्षे), निगडी (पुरुष ५९ वर्षे), चिखली (पुरुष ४५ वर्षे), मोशी (पुरुष ३५ वर्षे), डुडूळगाव (पुरुष ६३ वर्षे), सांगवी (पुरुष ७० वर्षे), राजगुरूनगर (पुरुष ६८ वर्षे), आंबेगाव (स्त्री ५३ वर्षे), खेड (पुरुष ७५ वर्षे), रांजणगाव (पुरुष ५७ वर्षे), देहुरोड (पुरुष ७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!