Google Ad
Editor Choice Maharashtra

Maval : मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणाचे ‘आमदार सुनील शेळके’ यांच्याहस्ते जल पूजन!

महाराष्ट्र 14 न्यूज : वरुणराजाच्या कृपेने मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवडकराची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या जलसाठयाचे आज मावळचे ‘आमदार सुनिल शेळके’ व त्यांची पत्नी ‘सारिका शेळके’ यांच्या हस्ते पूजन करत खणानारळाणी ओटी अर्पण करण्यात आली.

‘पवना धरण’ हे मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाला पाणी पुरवठा करणारे महत्वाचे धरण असून, त्यामुळे येथील परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. तसेच धरण आता ९८% भरले आहे, दोन दिवसापूर्वी पाण्याचे विसर्ग सुरु करण्यात आला. धरणातील जलसाठयाचा पूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, कुसुम काशीकर, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजेश्री राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव.

Google Ad

कार्यअध्यक्ष दीपक हुळवले, संत तुकाराम साखर कारखाना संचालक नरेंद ठाकुर ज्येष्ठ नेते महादू कालेकर बाळासाहेब काळे, अंकुश आंबेकर, मारुती काळे सरपंच सोमनाथ वाघुळे, सागर घाडगे, सोनुभाऊ काळे, अजित चौधरी, चेरमन अनिल तुपे,मारुती काळे , विश्वनाथ काळे, चंद्रकांत दहीभाते,विशाल वहिले, माणिक काळे, बाळू आडकर, भिमराव मोहोळ यांच्यासह सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिनिधी : अनुराग माने

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!