Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरव, नवी सांगवीत रोहित्राला वेलींचा विळखा … महावितरणची डोळेझाक!

महाराष्ट्र 14 न्यूज : शहरात सर्वत्र महावितरणकडून वीजपुरवठा करण्यासाठी रोहित्र बसविण्यात आले आहे. त्या रोहित्रामार्फत परिसरात वीजपुरवठा केला जातो. परंतु महावितरण विभाग या रोहित्रांची काळजी घेताना दिसून येत नाहीत. पिंपळे गुरव-पूजा हॉस्पिटल येथील रोहित्राला तसेच त्या भोवती असणाऱ्या कुंपणाला वेलींचा विळखा पडला आहे. परंतु महावितरण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. पिंपळे गुरव मधील पूजा हॉस्पिटल येथे कृष्णा अमृत पार्क सोसायटीला लागून महावितरणचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. त्या ट्रान्सफॉर्मर परिसरात तसेच भोवती असलेल्या तारेच्या कुंपणास वेलींचा विळखा बसला असून ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूला झाडेझुडपे वाढली आहेत.

पावसाळ्यात यामुळे आणखीनच भर पडली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने वाढलेल्या वेलींमुळे शॉर्टसर्किट होऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे महावितरण विभागाने त्वरित अशा रोहित्रांच्या परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे. परंतु वारंवार तक्रारी करून देखील महावितरण विभाग याची दखल घेताना दिसत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महावितरणला जाग येणार का असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.
रोहित्र सुरक्षित राहण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी जुने ऑइल काढून नवीन ऑइल टाकावे लागते.

Google Ad

त्यावेळी महावितरण विभागाने येथील परिसराची स्वच्छता केली तर अशा पद्धतीने जंगल सदृश्य स्थिती निर्माण होणार नाही. परंतु त्यावेळी नेमलेला अधिकारी व ठेकेदार लक्ष न देता केवळ आपले तात्पुरते काम पूर्ण करून निघून जात आहेत. त्यामुळे रोहित्रांन भोवती झाडे वाढत आहेत तसेच तारेच्या कुंपणास वेलींचा विळखा बसत आहे. परिणामी पावसाळ्यात एखाद्या वेळेस शॉर्ट सर्किट होऊन अपघात होण्याची भीती नागरिकांमध्ये होत आहे. त्यामुळे महावितरण विभागाने रोहित्रांच्या भोवती वाढलेल्या झाडेझुडपे तसेच तारेच्या कुंपनाभोवती वेलींचा विळखा दूर करण्यात यावा.

महावितरणचे दुर्लक्ष : शॉर्ट सर्किट होण्याची नागरिकांना भीती

महावितरण आमच्याकडून कोरोनाच्या काळात देखील अव्वाच्या सव्वा बिले घेत आहेत. परंतु महावितरण आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होत आहे. रोहित्राच्या आजूबाजूला बऱ्याच दिवसांपासून वेली, झाडे झुडपे वाढली आहेत. परंतु महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट पहात आहेत का असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
अनिल घनवट , स्थानिक नागरिक

नवी सांगवी, पिंपळे गुरव, पुजा हॉस्पिटल, कल्पतरू वैदूवस्ती आदी परिसरात महावितरणच्या रोहित्रांन भोवती झाडे झुडपे वाढत आहेत तसेच तारेच्या कुंपणास वेलींचा विळखा बसत आहे. झाडे झुडपे, वेलींनी अक्षरशः रोहित्राच्या आजूबाजूला तारेच्या कुंपणाला वेलींचा विळखा बसलेला दिसून येत आहे. महावितरण याकडे डोळे झाक करत आहे. वेळीच दक्षता न घेतल्यास एखादी दुर्घटना घडू शकते.
प्रदीप गायकवाड, मनसे प्रभागअध्यक्ष

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!