Google Ad
Agriculture News Health & Fitness Maharashtra

५ जून २०२१ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त … ‘सक्सेस ग्रुप’ यांचा सांगवी, नवी सांगवीकरांसाठ ‘झाडे लावा बक्षीसे मिळवा’ उपक्रम ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जून) : पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, प्रदूषण, जंगलातले वणवे आणि कोसळणारे हिमकडे… गेल्या काही वर्षांत भारताला अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. त्या संकटांची तीव्रता पर्यावरणातल्या मानवी हस्तक्षेपामुळे कशी वाढली यावरही अनेकदा चर्चा झाली आहे.

खरं तर पर्यावरणाचं महत्त्व काय आहे आणि माणसाचं अस्तित्व पर्यावणातल्या इतर सर्व घटकांवर कसं अवलंबून आहे, हे वेगळं सांगायला नको. आताची युवा पिढी त्याविषयी सजगही बनली आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी या पिढीचं वर्णन GenerationRestoration असं केलं आहे.

Google Ad

पण हे रीस्टोरेशन म्हणजे जीर्णोद्धार कसा करायचा? त्यासाठी आपण काय करू शकतो? तर स्वतःपासून सुरुवात करू शकतो. याच गोष्टीचा विचार करून ५ जून २०२१ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सक्सेस ग्रुप सांगवी आयोजित ‘झाडे लावा बक्षीसे मिळवा‘ ( सांगवी , नवी सांगवी मर्यादित ) असा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

🥦काय आहे, उपक्रम आणि असा घ्या सहभाग :-

१) शनिवार दि .५ जून २०२१ ते ११ जून २०२१ पर्यंत प्रत्येक कुटुंबाने १ झाड लावा

२) झाड स्वतःच्या घरासमोर / गॅलरीतील कुंडीत / घराच्या टेरेसवर कुंडीत किंवा सोसायटीच्या आवारात लावणे आवश्यक आहे .

३) झाड लावताना कुटुंबासमवेतचा फेटो खालील व्हॉटसअॅप क्रमाकावर दि .५ जून २०२१ ते ११ जून २०२१ पर्यंत पाठवा .

४) फोटो समवेत आपले नाव , मोबाईल नंबर व पुर्ण पत्ता पाठवणे आवश्यक आहे .

५) झाडे लावताना फोटो समवेत पर्यावरण विषयी एक घोषवाक्य लिहून पाठवा .

६) झाडे लावतानाचे फोटो श्री.दिलीप तनपुरे सर व सौ.मंदाकिनी तनपुरे यांच्या फेस बुक अकाऊंटसवर अपलोड करण्यात येतील .

७) झाडे लावणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आकर्षक बक्षीस घरपोच करण्यात येईल .

जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, “आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.”

पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू असल्याचे ‘दिलीप तनपुरे सर’ यांनी सांगितले.

▶️येथे करा संपर्क : 9850044312/9850044690

▶️आयोजक :-
श्री.दिलीप तनपुरेसर
अध्यक्ष सक्सेस ग्रुप
सौ.मंदाकिनी दिलीप तनपुरे अध्यक्षा सोनेत्रा महिला प्रतिष्ठाण

योजनेचा उद्देश वृक्षरोपन …. वृक्षसंवर्धन …. पर्यावरण संतुलन …. वसुंधरा रक्षण …

Google Ad

About the author

Maharashtra14 News

95 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement