महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .०४ जून २०२१) : शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि .०५ जून २०२१ रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने उद्या दि .०५ जून २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या ६३ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .०५ जून २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे . सोबत लसीकरण केद्रांची यादी जोडली आहे . तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा – या विद्यार्थ्यांकरिता विशेष कोविड -१ ९ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे .
पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा – या विद्यार्थ्यांनी आवश्यक वैध पुराव्यानिशी मी जबाबदार ऍपवर ४ जुन २०२१ रोजी दुपारी १२.०० वा . पर्यंत नोंदणी करणेत आलेली आहे , अशा लाभार्थ्यांचे दि .०५ जून २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नविन जिजामाता रूग्णालयात सकाळी १०.०० ते सायं .५.०० या वेळेत लसीकरण करणेत येणार आहे . अशा लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर त्यांचे स्वत : चे आधारकार्ड , परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा , व्हिसा मिळणेसाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले -20 किंवा DS – 160 From या कागदपत्राच्या सत्यप्रतीसह लसीकरण केंद्रावर उपस्थित रहावे .
सदर कागदपत्रांची छाननी करून कागदपत्रांच्या आधारे पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल . ज्या लाभार्थ्यांनी मी जबाबदार या ऍप वर नोंदणी केलेली आहे परंतु आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यामुळे लसीकरणास पात्र झालेले नाहीत , तसेच ज्यांनी मी जबाबदार ऍप वर नोंदणी केलेली नाही त्यांनी दर गुरुवार ते बुधवार पर्यंत मी जबाबदार ऍप वर नोंदणी करावी त्यांचे लसीकरण नवीन जिजामाता रुग्णालयात आठवडयामधील दर शनिवारी करण्यात येणार आहे .
I always was interested in this subject and stock still am, appreciate it for putting up.
I very delighted to find this internet site on bing, just what I was looking for : D likewise saved to fav.
I have been absent for some time, but now I remember why I used to love this web site. Thanks, I will try and check back more often. How frequently you update your website?
I am not sure where you’re getting your information, but good topic. I needs to spend some time learning much more or understanding more. Thanks for fantastic information I was looking for this info for my mission.
I like what you guys are up too. Such intelligent work and reporting! Keep up the superb works guys I have incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my web site 🙂