Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवीच्या युनियन बँकेने क्रॉस चेक केला गायब … मावशी कडून लग्ना साठी उसने पैसे घेतलेल्या नवरदेवाला बसला दोन लाख पन्नास हजाराला फटका!

महाराष्ट्र 14 न्यूज : लग्ना साठी मावशी कडून पैसे मागितले होते मावशीने बँक ऑफ बडोदा पिंपरी चिंचवड या शाखेतील ₹2,50,000/- चा धनादेश तेजस बापू सपकाळ या नावे दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी दिला. तो धनादेश युनियन बँक ऑफ इंडिया सांगवी शाखेत दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता जमा केला.

Google Ad

तो धनादेश 4 दिवस झाले तरी अजून जमा का झाला नाही याची चौकशी करण्या करीत रोज बँकेत जात असत पण त्यांना सिस्टीम डाउन आहे, तूमचा चेक प्रोसेस मदे आहे असे उडवा उडवी ची उत्तरे सांगवी शाखेतून दिली जात असत पण दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 .15 च्या सुमारास मावशी ला त्यांच्या मोबाईल वर 2,50,000/- डेबिट झाल्याचा मेसेज आला त्या नंतर त्यांनी तेजस सपकाळ याच्याशी संपर्क साधून सांगितले की माझ्या खात्यातून पैसे गेले आहेत, तुझ्या खात्यावर जमा झाले का?

त्या नंतर दुपारी 4 च्या सुमारास सांगवी शाखेत संपर्क केल्यास म्हटले की आजून जमा झाला नाही आमची सिस्टीम स्लो आहे असे सांगून टोलवा टोलवीची उत्तरे मिळत होती.
जमा होईल या आशेने अजून 2 दिवस वाट पाहून शेवटी सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 च्या सुमारास पुन्हा युनियन बँक ऑफ इंडिया सांगवी येथे जाऊन चौकशी केली असता तेच उत्तर मिळाले. म्हणून मावशी शी संपर्क साधून तिला सर्व संगीतले त्याच वेळी मावशीने तेजस सपकाळ यांना बोलावून घेऊन लगेच बँक ऑफ बडोदा पिंपरी चिंचवड शाखेत जाऊन चौकशी केली असता तेंव्हा त्यांना सांगण्यात आले की तुम्ही दिलेला धनादेश ₹ 2,50,000 हा बेरर होता. हे ऐकूनच त्यांना धक्का बसला मग त्यांना समजले की आपली फसवणूक झाली आहे. क्रॉस धनादेश दिलेला असताना तो बेरर झाला कसा ?

याची चौकशी केली असता त्यांनी जमा केलेल्या तुमच्या युनियन बँक ऑफ इंडिया च्या सांगवी शाखेत चौकशी करा की तो आमच्या कडे आला कसा? याची चौकशी करण्या साठी ते सांगवी शाखेत गेले असता त्यांना काहीही न सांगता बाहेर काढण्यात आले म्हणून त्यांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये मध्ये घडलेला प्रकार सांगितला पण त्यांची नोंद घेण्यास ही उशीर होत असल्याने त्यांनी उपायुक्त पोलीस कार्यालय पिंपरी चिंचवड येथे समक्ष साहेब आनंद भोईटे यांना सर्व हकीकत सांगितले त्यांनी ताबडतोब सांगवी पोलीस ठाण्यात स्वतः फोन करून त्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले. त्या नंतर सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. परंतु युनियन बँक ऑफ इंडिया च्या बाबतीत अजून कोणतीही निर्णय का घेत नाही? दोन दिवसावर येऊन ठेपलेले लग्न कसे होणार याची चिंता त्यांना सतावत आहे.

बेजबदार कोण युनियन बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा की ग्राहक ?

Google Ad

About the author

Maharashtra14 News

123 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!