Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pimpri Chinchwad

सांगवी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असलेल्या सराईत आरोपीस साथीदारासह अटक … रू. १,४५,००० किंमती च्या चार मोटारसायकल जप्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त , पिपरी – चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पाहिजे व रेकॉर्डवरिल आरोपी तपासुन परिसरात घडणारे घरफोडीचे तसेच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन प्रतिबंध करण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपी , घरफोडी तसेच वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवुन गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेशित केले होते .

Google Ad

या अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , पोहवा नारायण जाधव , पोना तुषार शेटे , पोलिस शिपाई शावरसिद्ध पांढरे , गोविंद चव्हाण, धनाजी शिंदे , तुषार काळे यांचे पथक दि .२५ फेब्रुवारी २०२१ रोजी हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत असतांना बातमी मिळाली की , सांगवी पोलिस स्टेशन गु.र.क्र .२ ९ ८ / २०२० भा.द.वि. कलम ३ ९ ४ मधिल फरार असलेला एक सराईत गुन्हेगार हा त्याचे एका साथिदारासह भुमकर चौक येथे येणार असुन त्यांचेकडे एक चोरीची मोटारसायकल आहे .

सदर बातमीच्या अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट -४ चे नमुद पथकाने भुमकर चौक येथे सापळा लावुन फरार आरोपी नामे विशाल विश्वनाथ कांबळे वय- २५ वर्षे , रा – नाना काटे यांचे कार्यालय शेजारी , काटे नगर , रहाटणी , पुणे यास त्याचा साथिदार एक विधिसंघर्षग्रस्त बालक , वय -१६ वर्षे , रा व्दारका कॉलनी , बुद्धविहार समोर , पिंपळे सौदागर , पुणे यास चोरीच्या एका मोटारसायकलसह ताब्यात घेतले.सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे कडे कसोशिने तपास केला असता त्याने व त्याचा ताब्यातिल वि.सं. बालक साथिदार याचेसह मिळुन पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरात वाहन चोरीचे ४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे .

सदर आरोपीकडुन तपासादरम्यान ०१,४५,००० / – रु कि . च्या ०४ मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत . यातिल आरोपी नामे विशाल कांबळे हा रेकॉर्डवरिल गुन्हेगार असुन त्याचेविरुद्ध यापुर्वी दंगा व तोडफोड तसेच जबरी चोरीचे ०२ गुन्हे नोंद आहेत . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त  कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त  रामनाथ पोकळे, पोलीस उप – आयुक्त , गुन्हे  सुधीर हिरेमठ  , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा ,  प्रशांत अमृतकर , यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा , युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , सहा.पो.उप.नि. धर्मराज आवटे , दादाभाऊ पवार , पोहवा / प्रविण दळे , नारायण जाधव , संजय गवारे , रोहिदास आडे , अदिनाथ मिसाळ , पोना / तुषार शेटे , लक्ष्मण आढारी , मो . गौस नदाफ , वासुदेव मुंडे पोशि / शावरसिध्द पांढरे , प्रशांत सैद , सुनिल गुट्टे , तुषार काळे , सुरेश जायभाये , धनाजी शिंदे , आजिनाथ ओंबासे , सुखदेव गावंडे , गोंविद चव्हाण , यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!