Google Ad
Editor Choice

धारदार हत्याराने पिंपरीत टोळक्याकडून तरुणाचा खून!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकामागून एक नवीन घटना घडत असून यात तरुणांच्या हत्या अधिक आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्यात भीतीचे वातावरण दिसत आहे. अशीच एक घटना पिंपरीत घडली, अगोदरच जुन्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने तरुणाचा खून केल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील पिंपरीमध्ये उघडकीस आली . यातील आरोपी फरारी आहेत . शंकर गोविंद सुतार ( वय २३ , रा . हनुमान मंदिरासमोर , विद्यासागर , चिंचवड ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे .

याप्रकरणी मृताची आई नीला पवार यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . त्यानुसार संतोष चौगुले ( वय २५ ) , अजय कांबळे ( वय २३ ) , मोसीन शेख ( वय २५ ) व पप्पू पवार ( वय २८ ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला . शुक्रवारी ( ता . २१ ) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास शंकर हा हनुमान मंदिरासमोर असताना आरोपी त्याठिकाणी आले . जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी शंकर याच्यावर धारदार हत्याराने वार केले . तसेच , दगडी पाटा डोक्यात घातला . त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले . मात्र , सकाळी दहाच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!