Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune

Pune : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा … पळण्याच्या नादात गमावला जीव!

महाराष्ट्र 14 न्यूज : वारजे माळवाडी येथील एका इमारतीत सुरू असणाऱ्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा घातल्यावर पळून जाताना एका व्यक्तीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली . या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . जाकिर पठाण ( वय ४८ , रा . गोखलेनगर ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . या प्रकरणी सहा जणांवर जुगार खेळण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून , चौघांना पोलिसांनी अटक केली आहे .

Google Ad

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी येथील तपोधन परिसरात एका इमारतीत जुगार खेळला जातो , याची माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती . त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी वरिष्ठ निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्या पथकाने तेथे छापा घातला . पोलिसांना पाहून काही जण दुसऱ्या मजल्यावर गेले . मात्र , पठाणने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली . यामध्ये तो गंभीर जखमी झाला . त्याला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले . मात्र , उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . जुगार अड्ड्याचा चालक व इतर काही जण पसार झाले .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!