Google Ad
Editor Choice Education Maharashtra

असा पाहू शकता निकाल …दहावी , बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावी च्या फेरपरीक्षेचा निकाल आज (बुधवार, 23 डिसेंबर) जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.

http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहून गुणपत्रिका डाऊनलोड करु शकता. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दहावीच्या (१० वी) परीक्षा घेण्यात आल्या होत्या तर बारावीच्या (१२ वी) परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत झाल्या होत्या.

Google Ad

यंदा दहावीचा निकाल 29 जुलै तर बारावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला होता. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. यावेळेस बारावीचे सर्व पेपर्स सुरळीत पार पडले होते. तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 15.69 लाख विद्यार्थी बसले होते. तर साधारण तितकेच विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान बोर्डाने 20 नोव्हेंबरपासून रिपीटर परीक्षा किंवा पुरवणी परीक्षा आयोजित केल्या होत्या. आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

589 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!