Google Ad
Editor Choice Maharashtra

Satara : काही कळायच्या आत भरधाव कार ४०० फुट दरीत कोसळली … महिलेचा मृत्यू तर गाडीतील दोन जणांना दरीमधून बाहेर काढण्यात यश!

महाराष्ट्र 14 न्यूज : लॉकडाउनमुळे सगळ्यांना गेली ६ महिने घरात कोंडून राहावं लागलं. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे लोक बाहेर पडू लागले आहेत. याच भावनेने मुंबईचे काही पर्यटक महाबळेश्वरला निघाले होते. मात्र त्यांच्या गाडीला साताऱ्याजवळ अपघात झाला आणि महाबळेश्वर पाहण्याचं त्यांचं स्वप्न अधुरचं राहिलं. त्यांच्यावर काळाने घात केला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यु झाला असुन दोन जण जखमी झाले आहेत.

साताऱ्यातल्या पाचगणी जवळच्या पसरणी घाटात हा अपघात झाला. पाचगणीहून ही मंडळी आपल्या स्विफ्ट कारने महाबळेश्वरकडे निघाली होती. वाईकडे जात असतानाच ड्रायव्हरचा कारवरचा ताबा सुटला आणि काही क्षणात गाडी घाटात ४०० फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यु झाला असुन महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Google Ad

या गाडीतील दोन जणांना जखमी अवस्थेत दरीमधून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमीं हे मुंबई येथील रहिवाशी आहेत अशी माहिती आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!