Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

औद्योगिक नगरीत खंडेनवमी कोरोनाच्या सावटाखाली उत्साहात साजरी … संस्कृतीचे घडले दर्शन!

महाराष्ट्र 14 न्यूज : औद्योगिक नगरीत खंडेनवमी कोरोनाच्या सावटाखाली उत्साहात साजरी.
भोसरी येथील डायनोमर्क कंपनीमध्ये खंडेनवमी निमित्त एक दिवस अगोदर कंपनीतील सर्व कामगारांनी आपल्या मशीनरीची  व सभोवतालच्या परीसराची स्वःच्छता केली .प्रत्येक कामगाराने आपल्या मशीनची नारळ फोडून, हार घालून सोसल डिस्टसिगचे अंतर  पाळुन विधिवत पूजा केली .सर्व कामगार व अधिकारी  ,व्यवस्थापकीय संचालक किशोर राउत  व संचालिका सौ आमिता राउत,यांनी प्रथम कंपनीच्या प्रवेशद्वाराची विधिवत पूजा केली. .कंपनीतील दत्त मंदिराला रंग देऊन ,आकर्षक विद्युत रोषणाई  रवि भेंनकी यांनी केली.

तर रंग देण्याचे काम एल्लापा पोंगुडवाला आणि रनजितसिंग यांनी केले. यावेळी भक्तीगितांनी मंदिर व कंपनीतील परीसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते .दत्ताच्या मंदिरासमोर सर्व कामगारांनी सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन अरून ठराविक अंतर ठेवून सामुहिक आरती केली . यावेळी व्यवस्थापकीय संचालक, किशोर राऊत यांनी सर्व कामगारांनी वर्षभर अपघात विरहीत केलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले.कोरोनाच्या महामारीमुळे जे आपले सर्वाचे नुकसान झाले त्यासाठी सर्वांनी स्वतःची व आपल्या सहकारी कामगारांची काळजी घेऊन आपण एकमेका “साहाय्य करू अवघे धरू सुपंथ “या सहकाराच्या उक्ती प्रमाणे सर्वानी एकोप्याने,हेवेदावे न करता जास्त जास्त उत्पादन करण्याचे यावेळी आव्हान राउत यांनी केले.

Google Ad

यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार आन्ना जोगदंड यांनी  “दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा” असे म्हणत दसऱ्याच्या सणाचे , खंडोनवमीचे व या काळातील आदीशक्ती देवीचे महत्व कामगारांना सांगितले. आपण आपल्या यंत्रामुळे व कंपणीमुळे प्रपंच चालवतो त्या कामाशी प्रामाणिक राहून स्वतः सुरक्षित राहून सूरक्षित काम केले पाहिजे असे मत आण्णा जोगदंड यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी संचालिका सौ आमिता राउत यांनी सांगितले की सध्या औद्योगिक क्षेत्रात खूप मंदी आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या कंपनीचे व आपले ही खूप नुकसान झाले आहे. प्रत्येकाने उत्पादन खर्चात काटकसर करुन उत्पादन वाढवण्याचे कामगारांना आव्हान केले.
दसऱ्यानिमित्त सर्व कामगारांना कंपनीच्या वतीने सर्व स्नेहभोजन देण्यात आले.कंपनीत काही उतकृष्ट कामगारांचा सत्कार करण्यात आला.

काही कामगारांना कोरोना झाला तेव्हा त्या कामगारांना दवाखान्यात दाखल करण्यापासून ते घरी सोडेपर्यत त्यांना दवाखान्यात जाऊन मदत केली म्हणून गुणवंत कामगार आण्णा जोगदंड याचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार  किशोर राऊत यांच्या उपस्थितीत विभाग प्रमुख ईधाते दिलीप व मनुष्यबळ विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वर्षभरात आधिक चांगले काम करणाऱ्या व  कोरोना काळात सुरुवातीपासून येऊन आधिक उत्पादन करण्यात 45  कामगारांना ही सन्मानीत करण्यात आले.सर्व कामगारांना भेटवस्तू  म्हणून आपटयाची पाने व आर्थिक मदत ही किशोर राउत यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळी कामगार वेगवेगळ्या वेशभूषा करून  कामावर आले होते.

मनुष्यबळ विकास विभाग प्रमुख सुर्यकांत मुळे यांच्या संकल्पनेतन सदर कार्यक्रम झाला, त्यांनी सर्व कामगरांना कोरोना आजार होऊ नये व झाल्यावर काय काळजी घ्यावी याची माहिती सर्व कामगरांना दिली.
यावेळी,व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत , संचालिका आमीता राउत,मनुष्यबळ विभाग प्रमुख सूर्यकांत मुळे,  विभाग प्रमुख दिलीप ईधाते,हर्षल शेळके, मोहशकृणन,राजेश वैद्य,अकाऊंट विभाग प्रमुख  प्रविण बाराथे,अक्षरा राऊत,विनायक शेरकर,केतकी राउत बापुराव हगारे ,ईत्यादी विभाग प्रमुख उपस्थित होते. मनुष्यबळ विकास प्रमुख सुर्यकांत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, रवी भेंनकी,एल्लापा पोंगुडवाला, रनजितसिंग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!