Google Ad
Editor Choice Pune

प्रबळ इच्छाशक्ती व सुनियोजित उपचारांच्या जोरावर १०५ वर्षाच्या आजीबाईंनी केली कोरोनावर यशस्वी मात

महाराष्ट्र 14 न्यूज : संपुर्ण जगाने धसका घेतलेल्या कोरोना महामारीच्या संसर्गाने, गरीब-श्रीमंत, जात-पात, लहान-थोर, ग्रामीण-शहरी अशा सर्व सीमा ओलांडल्या आहेत. संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या या महाभयंकर आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत. त्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या शेकडो कोविड योद्ध्यांनीही आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आश्चर्य म्हणजे आयटीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील १०५ वर्षाच्या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती आणि सुयोग्य उपचाराच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. शांताबाई हुलावळे असे या आजीबाईंचे नाव.

या आजीबाईंना कोरोनाची लागण झाली. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात महिनाभरापूर्वी पर्यंत अनेक खाजगी व सरकारी कोविड रुग्णालये कार्यरत होती; मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे त्यातली अनेक रुग्णालये कोरोनाबाधितांना भरती करून घेत नाहीत. त्यामुळे हुलावळे परिवारासमोर आजीबाईंच्या उपचाराचा मोठा प्रश्न होता.

Google Ad

वाकड व हिंजवडी परिसरात, गेल्या ८ – १० वर्षांपासून रुग्णसेवेत असणाऱ्या डॉ. किरण मुळे यांच्या गोल्डन केअर हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारासाठी १०५ वर्ष वयाच्या आजीबाई शांताबाई हुलावळे यांना दाखल करण्यात आले. आजीबाईंची प्रबळ प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉ. किरण मुळे आणि डॉ. रोहित कणसे यांनी केलेल्या सुनियोजित उपचारांमुळे अगदी काही दिवसातच कोरोना या महाभयंकर आजारावर आजीबाईंनी यशस्वी मात करून आजीबाई एकदम ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या. हुलावळे कुटुंबियांकडून आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून आजीबाईंना सतत धीर दिला जात होता; आणि याच गोष्टीची कोरोनाबाधितांना खरी गरज आहे.

आज पुणे, पिंपरी – चिंचवड सारख्या शहरात १०० वर्ष वयाची व्यक्ती बघायला मिळणे, ही एक दुर्मिळ गोष्ट झाली आहे. अतिशय विरळ लोकवस्तीचे गाव ते तासनतास वाहतूक कोंडी होणारे हिंजवडी गाव, अशा अनेक बदलांच्या शांताबाई हुलावळे साक्षीदार आहेत. हुलावळे कुटुंबीयांनी डॉ. किरण मुळे, डॉ. रोहित कणसे व हॉस्पिटलमधील सहकर्मचाऱ्यांप्रति आभार व्यक्त केले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

33 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!