Google Ad
Editor Choice Pune

पुण्यातील नवले ब्रिज जवळ विचित्र अपघात … ट्रकची ७-८ वाहनांना धडक

महाराष्ट्र 14 न्यूज : नवले ब्रिजजवळ होणार्‍या अपघाताची मालिका थांबता थांबत नाही. काही दिवसांपुर्वी ब्रिजजवळ भीषण अपघात होवून काही जणांचा मृत्यू झाला आहे. आज (बुधवार) पुन्हा एका भरधाव ट्रकने 7 ते 8 वाहनांना उडवल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. अपघातात एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Google Ad

भारती विद्यापीठ पोलिस आणि वाहतून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. कात्रजकडून नवले ब्रिजकडे जाणार्‍या भरधाव ट्रकने शोभणी हॉटेल समोर कार, रिक्षा इतर इतर वाहनांना धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

साधारण सुमारे 12.15 च्या आसपास कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने 7-8 वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 7 कार एक दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात रस्त्याच्या कडेला बसलेल्या महिलेच्या अंगावर स्फिट कार गेल्याने किरकोळ जखमी झाली आहे.बालेवाडी स्टेडियम येथे क्रिकेट खेळण्यासाठी निघालेली 7 ते 8 लहान मुलांच्या बॅलेरो कारला ट्रकने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की कार रस्त्याच्या मधील डिव्हाईडवर जाऊन अडकली. सुदैवाने मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही आणि मृत्यूच्या दारातून थोडक्यात बचावले. अचानक झालेल्या या अपघातामुळे लहान मुले धास्तावली आहेत. दरम्यान, अपघातानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस, पुणे वाहतूक पोलिस दाखल झाले असून. रस्त्यावरील गाड्या हटवून रस्ता मोकळा केला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!