Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष ‘सचिन साठे’ यांनी का दिला तडकाफडकी राजीनामा?

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘दात आहेत, पण चणे नाहीत, अशी अवस्था पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसची झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, आघाडीत काँग्रेस सत्तेत आहे, परंतु शहराला म्हणावा तसा फायदा झालेला पिंपरी चिंचवड शहरात तरी कधी जाणवला नाही. राष्ट्रीय काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या मुळे थोडीफार तरी चर्चा शहरात काँग्रेसची होत होती, तीही आता बंद होणार असे चित्र सध्या दिसत आहे, त्याला कारण तसेच आहे,

Google Ad

सचिन साठे यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा आज सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रत्यक्ष भेटून दिला आहे. त्याला कारणही तसेच आहे, गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे मतभेद होत असून, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हा वाद चर्चेत आला होता. त्यामुळे नाराज झालेल्या साठे यांनी पदाचा राजीमाना दिला आहे, आणि आता शेवटचा बुरुजही ढासळला …

याबाबत सचि साठे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ते म्हणाले, ‘मी गेली २४ वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम करतो आहे. एनएसयूआय चा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून सात वर्षे पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. सोनिया गांधी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ जिल्हाध्यक्ष म्हणून मला गौरविण्यात आले. पुढे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राजीव सातव हे असताना मी उपाध्यक्ष होतो. माझे काम पाहून थेट प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदावर माझी नियुक्ती करण्यात आली सात वर्षे तिथेही काम केले.

नंतरच्या काळात पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारली. पिंपरी चिंचवड शहर वाढत असताना, पक्ष वाढीचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसचे काम सुरू ठेवले तसेच ते वाढवले. पक्ष सांगेल ते काम केले, राष्ट्रवादीचे मातब्बर या शहरात आहेत. भाजपचे आमदार आणि महापालिकेत सत्ता आहे. शिवसेनेचे खासदार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला.

कुठलेही हत्यार नसताना लढत राहिलो, पण आता थकलो. विधान परिषदेसाठी मी इच्छुक होतो, त्यासाठई रितसर अर्जसुध्दा दिला होता. वरिष्ठांनी विचार केला पाहिजे होता, ते झालेले दिसत नाही. त्यातच आता वैयक्तीक कारणामुळे मला जबाबदारी सांभाळणे शक्य होत नाही. तसेच मी काँग्रेसमध्येच राहणार असून कुठेही इतरत्र जाणार नाही, असेही सचिन साठे यांनी यावेळी स्पष्ट केले.

आता प्रगतीचा आलेख उंचावत असलेल्या पिंपरी चिंचवड स्मार्ट शहराला कोणाच्या रूपाने नवीन अध्यक्ष मिळणार ? आणि सचिन साठे यांना काँग्रेस न्याय मिळवून देणार का? हा येणारा काळच ठरवेल!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!