Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोविड-१९ लसीकरण नोंदणी कुठे, केव्हा, कशी करायची … ‘मंदा फड’ यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांकडे केली ही मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : श्रीमती मंदा फड यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले असून यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १ मार्च २०२१ पासून ज्येष्ठ नागरिक व वय वर्षे ४५ पेक्षा अधिक पण गंभीर आजाराने त्रासलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करण्याबाबत जाहीर केले आहे. त्यात संपूर्ण देशात 10000 सरकारी व 20000 खाजगी रुग्णालयांना परवानगी दिल्याचे स्पष्ट केले आहे.

Google Ad

या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये कोणत्या खाजगी रुग्णालयांना परवानगी मिळाली व कोणत्या सरकारी रुग्णालयांमध्ये हे लसीकरण करण्यात येईल तसेच या लसीकरणासाठी कोठे व कसे नाव नोंदणी करावी या बाबत संपूर्ण माहिती महानगरपालिकेच्या पोर्टलवर तसेच वृत्तपत्रांमध्ये किंबहुना खाजगी होर्डिंग वर प्रसिद्ध करावी जेणेकरून हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लसीकरण करणे सोपे जाईल अन्यथा फक्त सरकारी रुग्णालयांवर गर्दी अति जास्त प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण याबाबतची माहिती प्रसारित करावी अशा मागणीचे निवेदन श्रीमती मंदा शिवाजी फड विभागीय संघटिका शिवसेना महिला आघाडी आकुर्डी, मोहन नगर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!