Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Bhosri : जे व्हायला नको होते, तेच झाले … महावितरणच्या निष्काळजीपणामुळे भोसरीत आजीचा गेला बळी, तर आई आणि ५ महिन्याचे बाळ गंभीर!

महाराष्ट्र 14 न्यूज : इंद्रायणीनगर मध्ये सेक्टर नंबर २ नाना नानी पार्क व राजवाडा परिसरात एक मोठा ट्रान्सफॉर्मर आहे. अनेक दिवसांपासून या परिसरात या ट्रान्सफॉर्मर व केबल संबंधातील तक्रार असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होता. याबाबत अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांशी ट्रान्सफॉर्मर केबल व डीपी संदर्भातील तक्रार केल्या होत्या. परिसरातील नागरिकांनी सुद्धा अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, अनेक वेळा ह्या विषयी पाठपुरावा केला. पण प्रत्येक वेळी वरच्यावर काम करून जाण्याचा प्रकार घडत होता. दर दोन-तीन दिवसाला वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत होता.

जिथे जॉईंट मारेल तिथे नेहमीच स्पारकिंग व्हायचा, पुढे काही तरी मोठा अनर्थ घडेल या कल्पना देऊन सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष करत होते. शुक्रवारी दिनांक ४ सप्टेंबर रोजी ह्या ट्रांसफार्मर ला मोठी आग लागली, देव कृपेने ही आग काल आटोक्यात आणण्यात आली व अनर्थ टळला. ट्रांसफार्मर ला शेजारी लागून असलेले घर हे त्यातून थोडक्यात बचावले. महावितरण अधिकाऱ्यांना कळविण्यात आले व त्यानंतर रात्री उशिरा महावितरणची गाडी काम करण्याकरता आली. शेजारी राहणाऱ्या घरातील लोकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखले, त्यांचेही बरोबरच होते, कुठे चुकत नव्हतं! कारण त्यावेळी त्यांनी जे अनुभवलं होतं ते कोणालाही शब्दात न सांगण्या येण्यासारख आहे.

Google Ad

त्यांची अधिकाऱ्यांना एकच विनंती होती की आम्ही या आगीतून थोडक्यात बचावलो आहोत तुम्ही आधी आजूबाजूचा परिसर म्हणजेच ही झाडे झुडपे साफ करून घ्या आणि मग विद्युत पुरवठा चालू करा. महावितरण या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आज दिनांक ५ रोजी पहाटे तीनच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत केला.
पण मग आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जे व्हायला नको होतं तेच झालं.. या ट्रान्सफॉर्मर ला पुन्हा एकदा मोठा बार होऊन मोठी आग लागली… आग एवढी प्रचंड होती अग्निशामक च्या दोन गाड्या बोलावे लागल्या व आग आटोक्यात आण्यात आली.

पण ती आग आज त्या शेजारच्या घरापर्यंत पोहोचली, जी महिला काल महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगत होती ती महिला आज आपल्या पाच महिन्यांच्या नातवाला घेऊन आपल्या घरात बसली असताना या आगीने त्या दोघांना आपल्या सपाट्यात घेतले, आज ती महिला ह्यात दगावली. बाळ हॉस्पिटल मध्ये सिरीयस आहे. काय चुक होती त्या अज्जिंची ज्या आपल्या नातवाला घेऊन बसल्या होत्या. का त्यांनी या महावितरणच्या निष्काळजीपणाचा भोग भोगावा?? अनेक वेळा तक्रार करून सुद्धा त्याचं निवारण होत नसेल तर काही उपयोग असल्या अधिकाऱ्यांचा आणि काय उपयोग असल्या विभागाचा?

का ह्या अधिकाऱ्यानं वरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ नये. या कोरोना काळात आधीच हतघाईला लागलेले नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकाऱ्यांना हक्क दिला कोणी? ज्यांच्या घरात मिटर नाही त्यांना २० आणि २५ हजारांचे बिल वितरित करण्यात येते.. अवाच्या सव्वा लाईट बिल लोकांना देण्यात आले.. अनेक वेळा आवाज उठून सुद्धा तक्रारींचे निवारण होत नाही.. यासंदर्भात महावितरणच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवराज सुदामराव लांडगे यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

106 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!