Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मधील मासळी व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत काय म्हणाल्या ‘महापौर माई ढोरे’

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात मासळी व्यवसाय करणा – यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे . त्यांच्या प्रश्नांकडे शहराच्या महापौर माई ढोरे यांनी लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. त्याच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी माई ढोरे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘ शहरातील वेगवेगळया भागांमध्ये ब – याच ठिकाणी मोजकेच लोक मासे विक्रीसाठी घेऊन येतात .

तसेच शहरात मासे विक्रेत्यांसाठी ठराविक आणि निश्चित अशी जागा दिसून येत नाही . त्यामुळे शहरातील बरेचसे मासे विक्रेते हे सध्या रस्त्याच्या कडेला अथवा नागरी भागात मासे विक्रीसाठी बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे . मासे विक्रेत्याकडील मासे विक्री करुन शिल्लक राहिल्यास दुस – या दिवशी न विकलेले मासे ठेवण्यासाठी शहरातील मासे विक्रेत्यांकडे मासे साठविण्याची अत्याधुनिक यंत्रणा तसेच पुरेशी व्यवस्था नसल्याने मासे लवकर खराब होतात .

Google Ad

सदर खराब मासळी ही रस्त्यांच्या कडेला टाकून दिल्यास घाणीच्या साम्राज्यामुळे तेथील परिसरात दुर्गंधी पसरते . तसेच तेथून ये – जा करताना नागरिकांना दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागतो याचबरोबर शहराच्या विद्रुपीकरणात देखील भर पडत आहे . शहरातील नागरिकांना ताजी मासळी मिळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती तसेच मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक मच्छी मार्केट असणे अत्यंत आवश्यक आहे .

त्यामुळे महापालिकेकडून मासे विक्रेत्यांना मार्केटसाठी जागा निश्चित करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केट उपलब्ध करुन देणे भविष्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत फायदेशीर ठरणार आहे . शहराच्या मध्यवर्ती भागात होलसेल मच्छी मार्केट उभारल्यास नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची ताजी मासळी ही एकाच ठिकाणी मिळून खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ , श्रम व पैसादेखील वाचणार आहे . तरी मच्छी विक्रेत्यांसाठी मूलभूत सोयी सुविधायुक्त गाळे उभारण्याकरिता जागा उपलब्ध करुन देणेबाबत मागणी महापौर माई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!