Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्यामुळे अखेर खंडित वीजपुरवठ्या पासून नागरिकांची होणार सुटका … प्रलंबित प्रश्नाला पूर्ण विराम!

महाराष्ट्र 14 न्यूज : नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे व भाजपा उपाध्यक्ष शेखर बबनराव चिंचवडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिद्धिविनायक कॉलनी, नंदनवन कॉलनी, शिवतेज- मोरेश्वर कॉलनी, साई राम कॉलनी या रहिवाशी कॉलनीचा खंडित वीजपुरवठ्याची समस्या कायमची सुटली.

आज पासून या भागात नवीन केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले,या सर्व कॉलनीमध्ये वीजपुरवठा करणारी उच्च वाहक क्षमतेची केबल चिंचवडे फार्म येथील ट्रान्सफॉर्मवरून येते मात्र बऱ्याच वर्षांपासून सदरची केबल 15-17 ठिकाणी जॉईंट असल्याने वारंवार शॉर्ट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते, नगरसेविका करुणा व शेखर अण्णा चिंचवडे यांच्या MSEB कडील यशस्वी पाठपुराव्यामुळे आता हा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे .

Google Ad

त्याचबरोबर वाढलेल्या वीज कनेक्शन धारकांची संख्या लक्षात घेता उच्च क्षमता वीज वाहक केबल ची क्षमता देखील वाढवून घेण्यात आली ,असंख्य अडचणी वर मात करत आज अखेर कामास सुरवात झाली त्याबद्दल महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नगरसेविका करुणा चिंचवडे यांनी आभार मानले.

या आगोदरही मागील महिन्यात कित्येक वर्ष प्रलंबित असलेला पिंपरी चिंचवड शहरातील आहेरनगर येथील चिंतामणी कॉलनी ब मधील खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला. प्रभागातील खंडित वीजपुरवठा आणि धोकादायक डी पी बॉक्स , कमी क्षमतेच्या केबल याबाबतही सातत्याने MSEB कडे नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा पाठपुरावा चालू होता. त्यामुळे याभागातील नागरिकही दसरा दिवाळीच्या तोंडावर प्रश्न सुटल्याने समाधानी असल्याचे दिसून येत आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!