Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : ‘ गृहमंत्र्यांना बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल ? ‘

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेनं काही कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तर आज कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय घेतले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Google Ad

मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली असून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासह लॉकडाऊनबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं आहे. दरम्यान, या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. मात्र, या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांना मागच्या दारानं यावं लागलं आहे. सद्या सचिन वाझे प्रकरण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं पत्र यामुळे अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता ते या बैठकीला मागील दाराने उपस्थित झाल्याने त्यांच्यावर भाजपने टीका केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, ‘खंडणीखोरीचा आरोप असलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल? जनतेला तोंड दाखवू न शकणारा गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अजूनही खुर्चीवर आहे… कारण वसुलीत सगळ्यांचा वाटा आहे,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!