Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

BIG BREAKING : पिंपरी चिंचवडकरांची चिंता वाढली … आज शहरात कोरोनाच्या संख्येत लक्षणीय वाढ

महाराष्ट्र 14 न्यूज, (२४ मार्च २०२१) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे प्रमाण लक्षणीय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.२४ मार्च २०२१ ) रोजी १८८१ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १८६५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील १६ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८२४ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २४०
ब – ३८६
क – १४२
ड – ३११
इ – १६७
फ – २०५
ग – २७१
ह – १४३
एकुण – १८६५

🔴पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – मोशी ( २२ वर्षे ) , पिं . सौदागर ( ५८ वर्षे ) , पिं . गुरव ( ७५ वर्षे ) , भोसरी ( ८६,७५ वर्षे ) , सांगवी ( ४२ वर्षे ) , पिंपरी ( ६२ वर्षे ) , ०३ स्त्री- पिंपरी ( ६७ वर्षे ) , चिंचवड ( ५८,६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

🔴पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – चाकण ( ६५ वर्षे ) , पाबळ ( ६५ वर्षे ) , आळंदी ( ६५ वर्षे ) , मावळ ( ७३ वर्षे ) , ०१ स्त्री – राजगुरुनगर ( ७० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

टिप : – आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!