Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवीत पाण्याची पाईप लाईन फुटल्याने काही काळ पाणी पुरवठा राहणार बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : नवी सांगवी मधील फेमस चौक ते साई चौक महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम चालू असून, त्याअंतर्गत रस्त्यात पाईप लाईन टाकण्याचे काम चालू आहे.

आज सकाळी कांकरिया गॅस एजन्सी चैत्रबन सोसायटी नवी सांगवी येथे नवी सांगवी या भागाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची पाईप लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊ लागल्याने नवी सांगवी परीसरातील पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला असून पाईप लाईन दुरुस्ती चे काम चालू केले आहे. काम पूर्ण झाले कि नवी सांगवी येथील नागरिकांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल. असे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!