Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सावधान : पिंपरी चिंचवड ‘ड’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत विना मास्क फिरणाऱ्यांवर प्रत्येकी ५०० रुपये दंडाची कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थीती गंभीर होत चाललेली आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासन स्थरावर प्रयत्न सुरू असून, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची ही परिस्थीती आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरणे हे बंधनकारक केले आहे. परंतू या नियमाचे शहरातील नागरिक पालन करताना दिसत नसल्यामुळे महानगरपालिका तसेच पोलिसांकडून नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे, आणि त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे.

८ सप्टेंबर रोजी ड क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रामध्ये कोविड – १९ चे अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय – योजना म्हणून कारवाई करतांना दत्त मंदिर रोड वाकड येथे २१ नागरीकांवर मास्क न लावलेबाबत दंडात्मक कारवाई करणेत येवून र.रु. १०,५०० / – . तसेच “ घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ” अंतर्गत कचरा अलगीकरण न करणा – या दोन सोसायट्यांवर र.रु. ६०० / – असे एकुण र.रु. ११,१०० / दंड वसूल करणेत आला .

Google Ad

सदरची कारवाई ड क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत कैलास गावडे , क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली, विनोद बेंडाळे , सहा. आरोग्याधिकारी, संदिप कोतवडेकर आरोग्य निरिक्षक प्रभाग क्र . २५ वाकड, ताथवडे, पुनावळे, शशिकांत मोरे, आरोग्य निरिक्षक प्रभाग क्र . २६ , पिंपळे निलख, वाकड तसेच वाकड पोलीस चौकीचे पोलीस उप निरिक्षक होले , कॉनस्टेबल माने व गोंधळे व आरोग्य विभागचे कर्मचारी यांचे सहाय्याने करणेत आली .

कोरानाचा धोका अद्याप कमी झाला नसल्यामुळे मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सतत हात धुणे गरजेचे आहे. या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून मास्कबाबत जागरुकता वाढवणे आहे. तसेच पुणेकरांनी कोविड19 च्या बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

66 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!