Google Ad
Editor Choice Health & Fitness india

भारतीयांची प्रतीक्षा ७३ दिवसांनी संपणार … केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली, गुड न्यूज!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची लस नेमकी कधी येणार याची सर्व नागरिक वाट बघत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्वदेशी बनावटीची कोरोना लस वर्ष अखेरीस येईल, असे ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. तर दुसरीकडे पुढील 73 दिवसात भारतात कोरोनाची लस उपलब्ध होईल, असा दावा सीरम आणि ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूटने केला आहे. तसेच ही लस सर्वांना मोफत मिळणार आहे.

भारत बायोटेक या कंपनीने बनवलेल्या Covaxin ही कोरोनाची लस या वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होईल. 2021 वर्षाच्या पहिले तीन महिने ही कोरोना लस आपण वापरु शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी दिली. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जगभरात कोरोना लस निर्मितीवर भर दिला जात आहे. भारतीय कंपनीने बनवलेली कोरोना लस येत्या वर्षाअखेरपर्यंत तयार होऊ शकते. त्यानंतर ही लस परिणामकारक आहे का हे समजू शकेल. तसेच सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडिया पहिल्यापासूनच ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत एकत्रित कोरोनाची लसीचे उत्पादन करत आहे. जेणेकरुन लवकरात लवकर कोरोना लसीची निर्मिती होईल. तर इतर दोन स्वदेशी लस तयार करण्यासाठी आणि बाजारात येण्यासाठी कमीत कमी एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या वर्षाअखेरपर्यंत कोरोनाची स्वदेशी लस बाजारात उपलब्ध होण्याची अपेक्षा वर्तवली आहे.”

Google Ad

तीन कोरोना लसीची अपडेट :-

ऑक्सफर्ड लस – सीरम इन्स्टिट्यूटने भारता कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु केली आहे. ही लस वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कोवॅक्सिन : हैद्राबादची भारत बायोटेकची कोरोना लसीची चाचणी दोन आठवड्यांपूर्वी सुरु करण्यात आली आहे. ही लसदेखील डिसेंबरपर्यंत येणार आहे.

जायकोव-डी : जायडस कॅडिला या कोरोना लसची क्लिनिकल चाचणी सुरु केली आहे. काही महिन्यात ही चाचणी केली जाईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

93 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!