Google Ad
Editor Choice india

नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी , ‘ ही ‘ कंपनी ३०० ते ५०० लोकांना देणार रोजगार

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाव्हायरसच्या संकटात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डिजिटल नेटवर्क सोल्यूशन्स प्रदान करणारी स्टरलाइट टेक्नॉलॉजी (Sterlite Technologies) चालू आर्थिक वर्षात सुमारे 300 ते 400 लोकांना रोजगार देणार आहे. 5 जी आणि वायरलेस सेक्टर वाढविण्यासाठी आणि जागतिक स्तरावर सर्व्हिसेसचा व्यवसाय करण्यासाठी कंपनी नवीन लोकांची भर्ती करणार आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद अग्रवाल म्हणाले की, कंपनी आवश्यक त्या क्षेत्रातील व्यावसायिकांव्यतिरिक्त या क्षेत्रांसाठी नवीन लोकांना (फ्रेशर्स) नियुक्त करेल. ते म्हणाले, आम्ही वायरलेस आणि 5 जी क्षेत्रात आमची स्थिती मजबूत करीत आहोत.या क्षेत्रांसाठी आम्ही लोकांना नोकरी देणार आहोत. आपली सर्व्हिस जागतिक स्तरावर नेण्याची कंपनीची योजना आहे आणि त्यासाठी नवीन लोकांची नेमणूक करण्याचीही तयारी करीत आहे.

Google Ad

अग्रवाल म्हणाले की, “आम्ही सातत्याने सध्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत आहोत. सध्याच्या परिस्थितीत जे काही आर्थिक नुकसान होत आहे, यासाठी एक प्लॅन तयार केला जात आहे. यासाठीच स्टरलाइट टेक्नॉलॉजीज चालू आर्थिक वर्षात 300 ते 400 लोकांना नोकरी देण्याची अपेक्षा करीत आहे. आपला सेवा व्यवसाय जागतिक स्तरावर नेण्यासाठी कंपनी स्ट्रक्चरल दृष्टीकोन स्वीकारेल. सध्या, स्टरलाइट टेक आपली उत्पादने जगाच्या इतर देशांमध्ये फायबर आणि केबलमध्ये विकतात.

अग्रवाल असेही म्हणाले की, सेवा व्यवसायासाठी आपण अजूनही भारतीय बाजारावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही संरक्षण, दूरसंचार, स्मार्ट सिटी आणि ग्रामीण ब्रॉडबँड प्रकल्पांवर काम करत आहोत. तसेच, यावर्षी सेवा व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात येण्याची कंपनीची योजना असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

65 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!