Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Usmanabad : ऑनलाइन फसवणुकीतून तरुणाची आत्महत्या … सोशल मीडीयाद्वारे झाली होती फसवणूक!

महाराष्ट्र 14 न्यूज : काही दिवसापुर्वी उस्मानाबाद शहरातील एका डीएमएलटी महाविद्यालयाच्या खोलीत एका तरूणाने आत्महत्या केली. मृत तरुण हा मुळचा मुरूम येथील होता असे प्राथमिक माहितीत समोर आले होते. याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. परंतु, तपासात या आत्महत्येचे खरे कारण पुढे आले आहे.

सदरील तरुणाच्या मोबाइलवरील सोशल मीडियावरील चॅटिंग व ई मेलवरून अडीच महिन्यांत ४५ लाख ४२ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्कॉटलंडच्या दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला. उस्मानाबाद शहरातील तुळजाभवानी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या वर्ग खोलीत २९ जानेवारी रोजी खंडप्पा कलप्पा कंटेकुरे (३५ रा. मुरूम) याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खंडप्पाने आत्महत्या केल्याची तक्रार भाऊ विलास कंटेकुरे यांनी दिली. त्यानुसार आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Google Ad

दरम्यान, याप्रकरणी खंडप्पाचे भाऊ विलास कंटेकुरे यांनी ५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ खंडप्पा याची सोशल मीडियावर चॅटिंगद्वारे स्कॉटलंड येथील दिव्या शर्मा या मुलीशी ओळख झाल्याचे समोर आले. त्यांच्यात झालेल्या चॅटिंगद्वारे ८ ऑक्टोबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान खंडप्पा यांची दिव्या शर्मा, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा मॅनेजर बिल एडमंड व इतरांनी विविध कारणांद्वारे ऑनलाइन पद्धतीने ४५ लाख ४२ हजार १०४ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!