Google Ad
Pimpri Chinchwad

“शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२” … पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपक्रमांबाबत पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस तयार करणार

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणा-या नागरी सुविधा नागरिकांना नियोजनबध्द पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मचा नागरिकांकडून जास्तीत जास्त वापर व्हावायासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती (डेटा) उपलब्ध करून शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी सहाय्य करण्यासाठी द अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२” या उपक्रमाद्वारे महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांबाबत पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस तयार करून त्याद्वारे सर्व उपक्रमांबाबतची कार्यवाही तसेच प्रगतीची योग्य पद्धतीने नियोजन करण्यास मदत होणार आहेअशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालायाद्वारे भारतातील शहरांमधील ऑनलाईन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण करण्यात येत आहे. नॅशनल अर्बन डिजिटल मिशन हे शेअर्ड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करीत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन नागरी सेवांची उपलब्धतानिवड आणि वापर या संदर्भात संपूर्ण देशभरातील नागरिकांचा दृष्टीकोन समजून घेणे हा या सर्वेक्षणाचा हेतू आहे.अर्बन फ्रेमवर्क आऊटकम्स २०२२ च्या  अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दुरगामी व सकारात्मक परिणाम करणा-या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महानगरपालिका सात्यत्याने प्रयत्न करीत आहे. याकामी महापालिकेमार्फत शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आरोग्यघनकचरा व्यवस्थापनरस्ते वाहतूकस्वच्छतासुरक्षापाणी व्यवस्थापनगृहनिर्माणशिक्षणस्थापत्यउद्यानवैद्यकीयपर्यावरणहॉकर्स झोन आदी क्षेत्रांसंबंधी विकासाशी निगडीत माहिती एकत्रित करून योग्य नियोजन आणि त्यानुसार धोरण ठरविण्यासाठी विविध विभागप्रमुखांची विचार विनिमय बैठक घेण्यात आलेली आहे.

Google Ad

शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२” हा लोकसंख्याशास्त्रअर्थव्यवस्थाशिक्षणऊर्जावित्तपर्यावरणप्रशासन आणि आयसीटीआरोग्यगृहनिर्माणगतिशीलतानियोजनसुरक्षा आणि यासारख्या क्षेत्रांमधील क्रॉस-सिटी परिणामांवर आधारित एक पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस विकसित करण्याचा उपक्रम आहे. विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर डेटा उपलब्ध करून शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगती साधण्याच्या प्रक्रियेस सुलभ करणे हा या योजनेचा हेतु आहे. नागरिकांमधून सर्वेक्षणाद्वारे महापालिका सेवांची ऑनलाइन उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी या रचनेचा वापर केला जातो. नॅशनल अर्बन डिजीटल मिशन एक सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा तयार करीत आहे. नागरिकांद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुलभ करण्यासाठी स्थानिक प्रशासनाद्वारे सेवा देण्याबाबत उत्सुकता दर्शविली असून महापालिका सेवांचा ऑनलाइन आणि ऑफलाइन वापर यासंदर्भातील दृष्टिकोन समजून घेण्यात येणार आहे.

सर्व सेवा सुविधांचा डेटाबेस अर्थात अद्ययावत माहिती महापालिकेकडे संकलित असणे आवश्यक आहे. तसेच ही माहिती सर्व शासकीय यंत्रणेसशहरातील नागरिकांनाउद्योग क्षेत्राला विविध माध्यमांद्वारे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्यामुळे महापालिका राबवित असलेले उपक्रमांची माहितीची पारदर्शकता नागरिकांमध्ये तसेच सर्व शासकीय यंत्रणेमध्ये वाढण्यास मदत होणार आहेअसेही आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!