Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिव्यांगांनी वेळेवर पेन्शन, दिवाळी खरेदीसाठी बोनस तसेच दिव्यांग बांधवांवर होणाऱ्या अतिक्रमण कारवाई बाबत पिंपरी चिंचवड मनपाकडे केली ही मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ ऑक्टोबर) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत, दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणेत येतात. पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत गेल्या दर महिन्याला दोन हजर रुपये पेन्शन चालू होती . महापालिकेच्या नवीन निर्णयनुसार ही पेन्शन दर महिन्याला न देता तीन महिन्याची एकदा देण्यात येइल असा निर्णय घेण्यात आला आहे .

कोरोना महामारीमुळे अनेक दिव्यांग बेरोजगार झाले आहेत . ज्यांचे व्यवसाय आहेत ते सुद्धा तोट्यात चालू आहेत . अनेकजण भाड्याने राहतात . काहींना दरमहा औषधं घ्यावे लागतात अशा परिस्थितीमध्ये दिव्यांगांना दरमहा पेन्शन हा मोठा आधार होता परंतु तीन महिन्याची एकत्र पेन्शन देण्याच्या निर्णयामुळे दिव्यांगांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे .

Google Ad

या महिना अखेरीस दिवाळीचा सण येत आहे . नुकतीच तीन महिन्यांची पेन्शन वाटप झाल्यामुळे ऐन दिवाळीत खरेदीला दिव्यांकडे पैसे नसतील त्यामुळे पेन्शन दरमहा दयावी तसेच दिवाळी खरेदीसाठी दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावेत . जेणेकरून घरभाडे , औषधोपचारासह घरखर्चाव्यतिरिक्त दिवाळी सन आनंदात साजरा करता येईल अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.

तसेच ज्या दिव्यांग बांधवांचे टपरीत चालू असलेले रोजगार आहे त्या जागेवरच त्यांचे पुनर्वसन करावे किंवा प्रथम त्यांचे पुनर्वसन करावे त्या नंतर कारवाई करण्यात यावी व सर्व दिव्यांग बांधवांना टपरीचे परवाने देण्यात यावे तरी आपण पूर्वी प्रमाणे दर महिन्याला पेन्शन चालू करुन दिवाळीसाठी बोनस देऊन सहकार्य करावे व अतिक्रमण कारवाई सुद्धा स्थगित करावी अशी मागणी अशोक अंबादास सोनवणे ( संस्थापक / अध्यक्ष ) अपंग सहारा संस्था यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंग याच्यांकडे केली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!