Google Ad
Editor Choice Health & Fitness Pimpri Chinchwad

‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या आमदार निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालयास अद्यावत रुग्णवाहिका … स्वतंत्रदिनी लोकार्पण!

महाराष्ट्र 14 न्यूज : उच्चतम् श्रेणीची अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकास निधीतून रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे आज लोकार्पण करून ती जिल्हा सामान्य रुग्णालय औंध यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम १५ ऑगस्ट ला सकाळी स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ अशोक नांदापुरकर, डॉ बी एल काकणे, डॉ संतोष देशपांडे, डॉ शर्मिला गायकवाड, बालाजी वाडजे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

आमदार लक्ष्मण जगताप यांनी आजपर्यंत अनेक मोठी महा आरोग्य शिबिर पिंपरीचिंचवड शहरात घेतली असून “जनसेवा हीच ईश्वर सेवा” मानत शहरातील गरीब रुग्णांना मदतीचा हात दिला, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून, तसेच शहरात करोनाचा वाढता उद्रेक पाहता आपल्या परिसरातील रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या भावनेने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

करोनाबाधित रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी सर्व सुविधा युक्त उपकरणांनी सज्ज असलेल्या या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडर, व्हील चेअर, इलेक्ट्रिक सक्सेन पंप, स्पाइन बोर्ड, माऊथ टु मास्क व्हेंटिलेटर डिव्हाइस अशा रुपये २५ लाख किंमतीच्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

248 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!