Google Ad
Editor Choice Health & Fitness Pimpri Chinchwad

सांगवीतील श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यासाच्या वतीने ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ … कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथे रक्तदान शिबीर संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहराचे महापौर आणि आयुक्त यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर भागात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सामाजिक संघटना, संस्था यांना रक्तदानाबद्दल आवाहन करण्यात आले त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक भावनेतून “समाजसेवा हीच ईश्वर सेवा” मानून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना कमी पडत असलेला रक्त पुरवठा त्यास मदत म्हणून, श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास व जिज्ञासा सोशल वेलफेअर ट्रस्ट तसेच पिंपरी चिंचवड म.न.पा. वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी चौथे “रक्तदान शिबीर”घेण्यात आले.

या शिबीरात एकुण ७५ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला . त्यावेळी पिं. चिं. चे महापौर माई ढोरे, न्यासाचे अध्यक्ष शरदराव ढोरे, न्यासाचे उपाध्यक्ष नंदकिशोर सगणे, सचिव मधुकर कोल्हे, खजिनदार ओंकार अंबुलकर व जिज्ञासा सोशल वेलफेअर ट्रस्ट चे अध्यक्ष मोहन तोडकर, कार्याध्यक्ष डॉ गणेश गरूड ,उपाध्यक्ष मंगेश भूजबळ, सचिव जीवन पवार, खजिनदार रोशन अहिरे, व विश्वस्त आणि न्यासाचे व मंडळाचे कार्यकर्ते, सेवेकरी उपस्थित होते. सर्वाच्या वतीने विजय केचे आणि डॉ गणेश गरूड सर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले तसेच पिंपरी चिंचवड म.न.पा.वाय.सी.एम.हॉस्पिटल रक्तपेढी च्या सर्व स्टाफ चे आभार मानले.

Google Ad

आज दि १५ आँगस्ट २०२० सर्वांना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या , आणि या पुढे संयुक्त रितीने असेच समाजासाठी , समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडू असे आपल्या भाषणात सांगितले. खरोखरच अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध रितीने कोरोना महामारी च्या काळात सर्वांनी सोशल डिस्टन्सचे पालन, तोंडाला मास्क आणि सँनिटायझर चा वापर केला. कार्यक्रमाच्या शेवटी विश्वस्त बब्रुवाहन वाघ यांनी श्रीं चा गजर करून कार्यक्रमाची सांगता केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!