Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरवमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ‘ भिमराव उमाजी पवार’ यांचे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवमधील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पवार यांचे वडील कै. भिमराव उमाजी पवार यांचे आज बुधवार दि. १० मार्च रोजी सकाळी ०९ वा. अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ‘चिंचणी’ हे त्यांचे मूळ गाव, दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, पुतणे नातवंडे असा परिवार आहे.

पिंपळे गुरव गावातील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात भिमराव पवार यांचा सदैव मोलाचा वाटा असायचा. कार्यमग्न आणि मदतीला धावून येणारे एक कार्यकर्ते म्हणून त्यांची परीसरात ओळख होती. १९६० साली ते कामानिमित्ताने पिंपळे गुरव येथे आले व दापोडीतील पाटबंधारे खात्यात त्यांनी आपली नोकरी केली. पिंपळे गुरव मधील गजानन महाराज मंदिराचे ते आधारस्तंभ होते, नवी सांगवी, पिंपळे गुरव मधील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही प्रार्थना!

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

29 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!