Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या होळी व धुलीवंदनाच्या सणाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तांनी दिले, हे आदेश …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोविड -१९ च्या वाढत्या आकडेवारी वरून कोविडची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे आपण सर्वांनीच अधिकाधिक काळजी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे . ही बाब लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सींग , सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे याबाबींचा अवलंब करावयाचा आहे .

Google Ad

कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या यंदाचा होळी व धुलीवंदन ( रंगपंचमी ) सणामध्ये नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे . व्यापक लोकहिताच्या दृष्टीने होळी व धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत .

🔴पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोविड -१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे , हॉटेल्स , रिसॉर्ट , सार्वजनिक सभागृहे , सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा , सर्व गृहनिर्माण संस्थांमधिल मोकळ्या जागा अगर रस्त्यावर रविवार दिनांक २८ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा होळीचा उत्सव तसेच त्यापुढील दिवशी म्हणजे सोमवार दिनांक २९ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा धुलीवंदन / रंगपंचमी हा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात येत आहे .

‘ मी जबाबदार ‘ मोहिमेअंतर्गत वैयक्तीकरित्या सुद्धा हा सण साजरा करणे टाळा-

🔴 महानगरपालिकेच्या मालकीचे ठिकाणे ( उद्याने , मैदाने , शाळा ) इ . तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारे होळी व धुलीवंदन तसेच कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे .

होळी व धुलीवंदन सण सार्वजनिक स्वरुपात साजरी करावयाचा नसल्याने या काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक / सांस्कृतिक / सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही . कोविड विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी , संबंधित नियम याबाबत देखील सहाय्यक आयुक्त तसेच क्षेत्रिय अधिकारी , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने जनजागृती करावयाची आहे .

तसेच याअनुषंगाने नियम भंग करणाऱ्यांवर , मास्क सुयोग्य प्रकारे परिधान न करणे , रस्त्यावर धुंकणे , विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे , गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सहाय्यक आयुक्त , क्षेत्रिय अधिकारी , पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी नियमितपणे करावयाची आहे . त्यासाठी ८ क्षेत्रिय अधिकारी पथके , ८ भरारी पथके तसचे ८ अंमलबजावणी पथके यांनी कडक कारवाई करावी . यापूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम त्याकरिता निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरु राहतील . संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार / राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील . सदर आदेश दि . २४.०३.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील . असे आदेश पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी २४ मार्च २०२१ रोजी दिले आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

807 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!