Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेविका साविताताई नरेश खुळे यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देवून …पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २४ मार्च ) : पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने विद्यमान नगरसेविका साविताताई नरेश खुळे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. संथापक अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले.

कोरोनाच्या संपूर्ण वर्षभराच्या काळात नगरसेविका सविता खुळे यांनी जीवाची पर्वा न करता जनसेवेला प्राधान्य देत कोरोना योद्धा म्हणून काम केले. लॉकडाऊनमध्ये गरजू लोकांना धान्य वाटप, मास्क वाटप, खबरदारी घेण्याबाबत वेळोवेळी नागरिकांमध्ये केलेली जनजागृती, औषध फवारणीसह विविध उपाययोजना राबवत परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

Google Ad

यावेळी सर्वसामान्य शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वाल्मिक आणा कुटे, पोपट आपा कापसे, श्रीराम नखाते, बळिराज जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यादव सर, नरेश खुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

70 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!