Google Ad
Editor Choice Maharashtra

ऐन थंडीत राज्यात पुढील दोन दिवसांत होणार मेघगर्जना … तर मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची भीती!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या.

त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणसह मराठवाडा, विदर्भात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसात निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Google Ad

गेले दोन दिवस कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुढील दोन दिवस कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभावमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.

पुण्यातही अनेक भागांत पुढिल दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याचं पाहायला मिळालं. तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!