Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : १५ डिसेंबरपासून १२ वी च्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार … कसा भरायचा अर्ज या संबंधी अधिक माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनामुळे यंदा शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असली तरी ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आला आहेत. परीक्षा कधी आणि कशा घेणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही मात्र 23 नोव्हेंबरपासून राज्यातील ग्रामीण भागातील 9 ते 12 वी शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली आहे. याशिवाय ऑनलाइन अभ्यासक्रम देखील पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

2021मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोमवारी म्हणजेच 15 डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी सरल डेटा बेस वरून 15 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान अर्ज भरू शकणार आहेत.व्यवसाय अभ्यासक्रम घेतलेले विद्यार्थी 5 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान अर्ज भरू शकणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे इथून ऑनलाइन पत्रक जारी करण्यात आलं आहे.

Google Ad

कसा भरायचा अर्ज
http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन तिथे आपण इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार आहात. तिथे आपलं नाव, वैयक्तीक माहिती आणि विषय इत्यादी माहिती भरायची आहे. हा फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून लॉगइनमधून प्री लिस्ट दिली जाणार आ़हे. या प्रीलिस्टची प्रिंट काढून त्यावर विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करावी आणि महाविद्यालयाकडे जमा करावी.

या संबंधीची अधिक तपशील

http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर HSC एप्रिल-मे ऑनलाइन अॅप्लिकेशन इथे उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी ते नीट वाचून भरावेत. कोरोनाच्या संसर्गामुळे अजूनही 100 टक्के शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली नसली तरी ऑनलाइन माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. जानेवारीमध्ये महाविद्यालयं 100 टक्के सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार परीक्षा ऑनलाइन होणार की लेखी याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!