Google Ad
Editor Choice Pune

मांडूळाची तस्करी करून खूप पैसे कमविण्यासाठी गेलेला तरुण अटकेत … १५ लाख होती किंमत!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारती विदयापीठ पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी पोलिस उप – निरीक्षक महेंद्र पाटील हे त्यांचे स्टाफसह पोलीस ठाणे हददीत पेट्रोलींग करीत असताना तपास पथकातील पोलीस कर्मचारी श्रीधर पाटील व शंकर कुंभार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , एक इसम मांडुळ जातीचे वन्य प्राणी १५ लाख रुपयांस विक्री करण्याकरिता कात्रज स्मशान भुमी जवळ विक्री करणेसाठी येणार आहे .

ही बातमी एम.डी.पाटील यांनी भारती विदयापिठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांना समजावून सांगितली असता , त्यानी वन अधिकारी यांना तसेच दोन पंचांना बोलावुन त्यांना सोबत घेवुन जावुन योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याची आदेशित केले . आदेशाप्रमाणे एम.डी.पाटील , वनपरिक्षेत्र अधिकारी , दोन पंच तसेच तपास पथकाचे कर्मचारी यांनी कात्रज केंाढवा रोड कात्रज स्मशान भुमी मेनगटजवळ सापळा लावुन रात्रौ ८ .१० वा सुमारास विकास रामचंद्र फडतरे , वय -२८ वर्षे , रा.मु.पो.बोपगाव , ता.पुरंदर याला ताब्यात घेतले .

Google Ad

त्याच्या हातातील पांढरे रंगाचे प्लॅस्टिक गोणीमध्ये कि.रु .१५,००००० चे मांडुळ जातीचा सरपटणारा दोन प्राणी असुन वजन अंदाजे दिड किलो वजनाचे व दोन फुट लांबीचे मिळुन आलेने त्याचेकडे अधिक चौकशी करता सदरचे मांडुळ हे सुमारे पंधरा दिवसापुर्वी शेतामध्ये मिळालेले आहेत व त्याची विक्री करुन खुप पैसे मिळत असल्याने तो ते विक्रीसाठी घेवुन आलो असल्याचे सांगितले . त्याचेवर वन्यजीव संरक्षण कायदयान्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक केलेली आहे.अधिक तपास पोलिस उप – निरी एम.डी.पाटील हे करीत आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!