Google Ad
Editor Choice Maharashtra

Nashik : स्वबळावर भगवा फडकवणार … हे मी 30 वर्षांपासून ऐकतोय , शरद पवारांचा सेनेला टोला!

महाराष्ट्र 14 न्यूज : शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून  शिवसैनिकांना सांगितलं जात आहे, यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला. स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आलो आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवसेनेचे कान उपटले.

दरम्यान, महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीनं आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी शिवसेनेला टोला लगावला.

Google Ad

शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. कांदा व्यापारी, शेतकरी, बाजार समितीच्या संचालकांशी शरद पवार यांनी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अघोषित कांदा लिलाव बंदवर चर्चा केली. कांदा प्रश्नावर तोडगा काढा, असं व्यापाऱ्यांनी शरद पवारांकडे मागणी केली. केंद्र सरकारला स्टॉक लिमिट रद्द करण्याची विनंती करा, असं साकडं देखील व्यापाऱ्यांनी घातलं. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले की, शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसैनिकांना सांगत असेल. पण हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष मोठं करण्याचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या का?

हा निर्णय इतर संबंधित पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. मात्र, भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये. महाविकस आघाडी सरकारला राज्यातील जनतेची पसंती आहे. जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या, असा सल्ला देखील शरद पवार यांनी यावेळी दिला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!