Google Ad
Editor Choice Pune

हे पुण्यात घडतंय … पुण्यात कोरोना मृतांसाठी पुरुषांनाही लाजवेल असं या महिलेच कार्य!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढते मृत्यू पुण्यात होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाला तर कोणी मृतदेह ही ताब्यात घेत नाहीत. कोरोना मृतदेहावर अनेकदा विधीवत अंत्यसंस्कार होत नाहीत म्हणून नातेवाईक हवालदिल असतात. प्रत्येक धर्मचा अंत्यसंस्कार हा त्यांच्या विधीप्रमाणे झाला पाहिजे असं प्रत्येकला वाटतं. मात्र, कोरोना मृतदेह असल्याने तो विधी करता येत नाही.

पण पुण्यातील ख्रिश्चन धर्मात कोरोना मृत्यू झाला तर दफनविधीसाठी खड्डा खोदण्या पासून ते माती टाकेपर्यंत काम करून धर्माप्रमाणे प्रार्थना करत अंत्यसंस्कार करण्याचं काम एक महिला करत आहे. पुरोगामी पुण्यात सावित्रीबाई फुलेंचा वारसाच सगाई नायर चालवत आहेत.

Google Ad

सगाई नायर यांनी कोविड १९ च्या प्रादुर्भावाने मृत्यू झालेल्या ३० व्यक्तींच्या ख्रिश्चन धर्माप्रमाणे अंत्यविधी केल्या आहेत. गेली चार महिने त्या स्वतः अंबुलन्समधून मृतदेह घेऊन दफनभूमीपर्यंत घेऊन जातात. ख्रिश्चन धर्मानुसार प्रार्थना वाचन करून स्वतः आपल्या हाताने मृतदेह खड्ड्यात पुरतात. खड्डा खणण्यापासून ते तो भरण्यापर्यंत सगळी काम त्या स्वत: करतात व नंतर खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे.

हे सर्व सॅलिस्बरी पार्क मीशनरी दफनभूमीत गेले 4 महिने त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे. सर्व मदत करणाऱ्याना करतात महिलांनी पुढे याव असं नायर सांगतात. त्यांना मदत करण्यासाठी मुस्लिम मुलं निवासी मंच सहकार्य करत आहेत. सगई नायर या गरज पडली तर दुसऱ्या समाजातील निराधार व्यक्तींवर ही अंत्यविधी करतात. त्यांच्या या कामामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतूक होतं आहे. एखाद्या पुरुषालाही लाजवेल असं काम सगई नायर करत आहेत.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

64 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!