Google Ad
Editor Choice Pune

पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी वाहतूक विभागाने वाहतुकीत … असे केले बदल !

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी वाहतुक विभागाचे हद्दीतील ढोरे पाटील सबवे मधुन औंध डी – मार्ट कडेजाणारा पुलाजवळ नवीन पुलाचे काम करण्याचे नियोजित केले आहे . महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्या नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायद्यानुसार सुधीर हिरेमठ , पोलीस उप आयुक्त , वाहतुक शाखा , पिंपरी चिंचवड शहर यांनी ढोरेपाटील सबवे कडुन भाले चौकाकडे जाणा – या रोडवर तात्पुरते बदल करण्यात येत आहेत असल्याचे जाहीर केले आहे.

➡️असे असतील वाहतुकीचे बदल :-

Google Ad

🔴 सांगवी वाहतुक विभाग हद्दीतील ढोरे पाटील सबवे मधुन औंध डी मार्टकडे जाणार पुल पुर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे .

🔴पर्यायी मार्ग- राजीव गांधी पुलावरुन औंध मार्गे इच्छित स्थळी तसेच रक्षक चौकाकडुन पिंपळे निलख – बाणेर मार्गे इच्छित स्थळी जावे.

या बदलाच्या काळात वाहतुक बदलाबाबत वाहतूक कर्मचारी व वॉर्डन यांना सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर , वाहतुक शाखा यांचे मार्फत करण्यात आले आहे . असे सुधीर हिरेमठ पोलीस उप – आयुक्त , वाहतूक पिंपरी चिंचवड शहर यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

73 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!